Fruit Omelet - फळे भरून केलेले ऑम्लेट

लहान मुलांना १००% टक्के आवडणारा पदार्थ. अंड्याचे फळे भरून केलेले गोड ऑम्लेट ! रविवारच्या सकाळ च्या breakfast ची सुरुवात ह्या गोडाने करा.

लागणारा वेळ: १० मिनिटे
जणांसाठी:
साहित्य :
 • ६ अंडी
 • 1/4 कप heavy cream
 • ३ चमचे पिठीसाखर
 • २ अननसाचे तुकडे बारीक करून
 • ४ strawbery चे बारीक तुकडे करून
 • २ kiwi चे बारीक तुकडे करून
 • २ चिकूचे बारीक तुकडे करून
 • ८-१० द्राक्षे
 • दही
 • मध
 • मीठ

कृती :
१. gas वर तवा ठेवून त्यामध्ये तेल ,गरम करून घ्या. नंतर अंडे, heavy cream आणि मीठ एकत्र करून चांगले  फेटून घ्या.
२. मिश्रण तव्यावर ओतून ते दोन्ही बाजूने नीट शिजवून घ्या.
३. एका जाड पेपरावर पिठीसाखर पसरवून त्यावर हे तयार ऑम्लेट ठेवा.
४. ऑम्लेटच्या मध्यभागी कापलेली फळे पसरवून मध्यभागी डोशासारखी घडी करा.
५. दही आणि मध एकत्र करून घडी केलेल्या ऑम्लेट वर पसरावा.
६. गरम गरम fruit omlet खायला द्या. 
Fruit Omelet - फळे भरून केलेले ऑम्लेट Fruit Omelet - फळे भरून केलेले ऑम्लेट Reviewed by Prajakta Patil on February 21, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.