Chocolate Covered Strawberries - चोकोलेट कव्हर्ड स्ट्रोबेरीज

Valentines Day साठी खास गोड पाक-कृती.  आजच्या दिवसासारखीच गोड, बनवायला एकदम सोपी आणि टेस्टी !  खाली दिलेली कृती वाचा आणि आपल्या valentine ला स्वस्त आणि मस्त, romantic  गिफ्ट द्या.
आपले अभिप्राय द्यायला विसरू नका

Happy Valentines Day  
लागणारा वेळ:  ४०- ४५ मिनिटे 
जणांसाठी: ६-८
साहित्य:
  • १ डझन Strawberries
  • १  कप मिल्क चोकोलेट, तुकडे केलेले 
  • १ कप डार्क चोकोलेट, तुकडे केलेले
  • १ कप व्हाईट चोकोलेट, तुकडे केलेले 
कृती:
१.  Strawberries नीट धुऊन घ्या आणि पूर्णपणे कोरड्या करा.
२. बेकिंग ट्रे वर बेकिंग पेपर पसरावा.
३. Microwave safe bowl मध्ये चोकोलेट पूर्ण वितळून घ्या. मध्ये' मध्ये हलवत रहा. चोकोलेट 'खूप जास्त गरम होऊ देऊ नका. अशा प्रकारे बाकीची चोकोलेट वितळवून घ्यावीत.
४.  Strawberries देठाकडून पकडून  त्याचा १/३ भाग चोकोलेट मध्ये बुडवा. बुडवताना Strawberry गोलाकार  फिरवा म्हणजे चोकोलेट सगळीकडे नीट बसेल. ही berry तयार केलेल्या बेकिंग ट्रे वर  ठेवा.
५. अशा प्रकारे berry डार्क आणि व्हाईट चोकोलेट मध्ये बुडवून घ्या.
६. सगळ्या berries कव्हर करून झाल्या कि तयार  बेकिंग ट्रे वर ठेवा. हा ट्रे फ्रीज मध्ये साधारण १/२ तास ठेवा म्हणजे चोकोलेट नीट सेट होईल.


Chocolate Covered Strawberries - चोकोलेट कव्हर्ड स्ट्रोबेरीज Chocolate Covered Strawberries - चोकोलेट कव्हर्ड स्ट्रोबेरीज Reviewed by Prajakta Patil on February 13, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.