Bhel Puri - भेळ पुरी

मुंबईमध्ये रस्त्या-रस्त्यावर अगदी माफक दारात मिळणारी अतिशय चविष्ट डिश. कॅलरी कमी असल्याने सर्व वयोगटातील माणसे भेळेचा आस्वाद घेऊ शकतात. भेळ पुरी normally पेपर कोन मध्ये देतात आणि वरून एक कडक पुरी जिचा चमच्यासारखा उपयोग करून भेळ खातात.  बाहेरचे ज्यांना unhyginic वाटते आणि भेळ खावीशी पण वाटते अशांसाठी भेळेची कृती खाली देत आहे.


लागणारा वेळ: १० मिनिटे
जणांसाठी: ८-९

साहित्य :
 • ४ मोठ्या वाट्या कुरमुरे 
 • १०० ग्रॅम बारीक शेव
 • १ कैरी 
 • ३ मध्यम कांदे
 • ३ मध्यम बटाटे
 • २ मोठे टोमाटो
 • थोड्या कडक पुऱ्या
 •  पुदिना चटणी
 • खजूर चटणी
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • मीठ (गरजेनुसार )
 • लाल तिखट (चवीनुसार) 
कृती :
१. प्रथम पुदिना चटणी आणि खजूर चटणी करून ठेवावी.
२. बटाटे उकडून घ्यावेत, उकडताना त्यात थोडी हळद आणि मीठ घालावे.
३. उकडलेल्या बटाटयांची साले काढून बारीक फोडी कराव्यात.
४. टोमाटो आणि कैरी बारीक चिरून घ्यावी.
५. एका मोठ्या भांड्यात कुरमुरे, टोमाटो, थोडीशी कैरी, मीठ, लाल तिखट आणि थोडासा कडक पुऱ्यांचा चुरा घालून, वरून किंचित लिंबाचा रस घालून सर्व नीट एकजीव करावे.
६. तयार भेळ छोट्या छोट्या डिश मध्ये घालून वरून थोडी तिखट व थोडी गोड चटणी घालावी.
७. वरून कोथिंबीर आणि बारीक शेव घालून, एक कडक पुरी ठेवून खायला द्यावी. 
Bhel Puri - भेळ पुरी Bhel Puri - भेळ पुरी Reviewed by Prajakta Patil on February 19, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.