आम्ही भाजणीचे थालीपीठ आठवड्यातून दोनदा बनवतो. पण आज मी भाजणी न वापरता, रात्रीचा शिल्लक राहिलेला भात आणि थोडी पीठे वापरून थालीपीठ बनवले आहे आणि महत्वाचे म्हणजे सगळ्यांनी ते आवडीने खाल्ले. बर खाताना कोणाला समजले पण नाही कि त्यात शिळा भात आहे. आहे कि नाही मजा ! तर असे हे चमचमीत, मस्त थालीपीठ नाष्ट्यासाठी नक्की करून बघा किंवा संध्याकाळी गरम-गरम चहाबरोबर गरम-गरम थालीपीठ वाढा. नेहमीप्रमाणे तुमची मते देण्यास विसरू नका.
लागणारा वेळ : २०-२५ मिनिटे
जणांसाठी : ६- ७
१.प्रथम भातामध्ये वरील सर्व पदार्थ एकत्र करून मळून घ्यावे. मळताना थोडे-थोडे पाणी घालावे. जास्त पातळ करू नये.
२.प्लास्टिकच्या पिशवीला पाण्याचा हात लावून थालीपीठ थापून घ्यावे.
३.नंतर तव्यावर तेल टाकून थालीपीठ दोन्ही बाजून चांगले शिजवून घ्यावे . झाकण ठेवू नये.
४.गरम-गरम थालीपीठ चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर खायला द्यावे.
Mixed Rice Thalipeeth
Mixed Rice Thalipeeth
Mixed Rice Thalipeeth
Mixed Rice Thalipeeth
Mixed Rice Thalipeeth
Mixed Rice Thalipeeth
लागणारा वेळ : २०-२५ मिनिटे
जणांसाठी : ६- ७
साहित्य :
- २ वाट्या तयार भात (रात्रीचा उरलेला असेल तरी चालेल)
- १ चमचा गव्हाचे पीठ
- ४ चमचे बेसन
- ४ चमचे तांदळाचे पीठ
- १/२ कांदा, बारीक चिरून
- १ टोमाटो, बारीक चिरून
- १ चमचा मिरची-आले-लसूण पेस्ट
- जिरे
- कोथिंबीर
- हिंग
- हळद
- तिखट
- मीठ (चवीनुसार )
१.प्रथम भातामध्ये वरील सर्व पदार्थ एकत्र करून मळून घ्यावे. मळताना थोडे-थोडे पाणी घालावे. जास्त पातळ करू नये.
२.प्लास्टिकच्या पिशवीला पाण्याचा हात लावून थालीपीठ थापून घ्यावे.
३.नंतर तव्यावर तेल टाकून थालीपीठ दोन्ही बाजून चांगले शिजवून घ्यावे . झाकण ठेवू नये.
४.गरम-गरम थालीपीठ चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर खायला द्यावे.
Bhatache Mishr Thalipeeth - भाताचे मिश्र थालीपीठ
Reviewed by Prajakta Patil
on
February 28, 2013
Rating:

No comments:
Post a Comment