Ambyacha Muranba - आंब्याचा मुरंबा

आंब्याचा मुरंबा बनवताना कच्ची कैरी, साखर आणि spices वापरतात. आंब्याऐवजी strawberry, cherries वापरून सुद्धा हा मुरंबा करता येतो. नेहमी पोळीबरोबर खाता येणारा हा मुरंबा, लहान मुलांच्या डब्यातही देता येतो. तसाही आंब्याचा मोसम सुरु झाला आहे, तर मग बाजारातून चांगले आंबे बघून घ्या आणि मुरंबा करून बघा.

साहित्य:
  • ५०० ग्रॅम कच्ची कैरी, किसलेली 
  • १ किलो साखर 
  • केशर दांड्या 
  • वेलची पूड 
  • २ लवंगा 
कृती:

१. किसलेली कैरी कुकर मधून २ शिट्या देऊन शिजवा.
२. शिजलेली कैरी थंड होऊ द्या.
३. १ किलो साखरेत हि कैरी मिक्स करून, गरजेपुरते पाणी घालून मंद आचेवर शिजवत ठेवा. साखर विरघळेपर्यंत सारखे ढवळत रहा.
४. साखर विरघळली कि gas बंद करून केशर आणि वेलची पूड टाकून नीट एकजीव करा.
५. तयार मुरंबा सुख्या बाटलीत भरून फ्रीज मध्ये ठेऊन द्या.
६ . फ्रीजमध्ये ठेवलेला मुरंबा ६ महिन्यांपर्यंत टिकू शकतो.


No comments:

@templatesyard