White Sauce - व्हाईट सॉस

साहित्य :
  • १ चमचा बटर
  • १ कप दुध
  • १ चमचा मैदा
  • मिरपूड (चवीनुसार)
  • साखर (चवीनुसार)
  • मीठ (चवीनुसार)
कृती :
१. saucepan मध्ये मंद आचेवर बटर पातळ होईपर्यंत वितळवा.
२. त्यामध्ये मैदा घाला व २ मिनिटे शिजवून घ्या.
३. शिजताना मैद्याचा रंग बदलण्यापूर्वीच दुध घाला. मंद आचेवर मिश्रण सारखे हलवत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
४. चवीनुसार मीठ आणि मिरपूड घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत रहा.

टीप : आवडत असल्यास किसलेले चीज घातले तरी छान चव लागते. चीज वापरायचे असेल तर मीठ थोडे कमी वापरावे.
White Sauce - व्हाईट सॉस White Sauce - व्हाईट सॉस Reviewed by Prajakta Patil on January 09, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.