Tomato Aamti - टोमाटो आमटी

टोमाटोची आमटी - चवीला आंबट गोड. लालेलाल. खुपदा तेच वरण-भात खाऊन कंटाळा येतो. मग विचार कसला करताय ? चला तर मग ही आमटी आजच करून बघू. आता तुमच्याकडे नेहमीच्या तुरीच्या वरणाला टोमाटो आमटी एक चांगला पर्याय असेल.

लागणारा वेळ: १५ मिनिटे
जणांसाठी: ३-४
साहित्य :
 • ३ टोमाटो 
 • १  कांदा, कापलेला
 • २-३ मिरच्या 
 • १/२ चमचा कश्मिरी लाल तिखट 
 • १/२ चमचा लाल तिखट 
 • १/४ वाटी नारळाचा कीस
 • भाजलेले शेंगदाण, मुठभर 
 • ५-६ लसूणच्या  पाकळ्या
 • १ चमचा उडीद डाळ
 • १ चमचा तांदूळ
 • साखर किंवा गुळ (आवडीनुसार )
 • हळद
 • हिंग
 • कढीलिंब
 • मोहरी
 • मीठ (गरजेनुसार)
 • तेल
कृती :
१. टोमाटो नीट धुऊन त्याच्या उभ्या मोठ्या फोडी कराव्यात.
२. उडदाची डाळ व तांदूळ थोड्या तेलावर खमंग भाजावी.
३. नारळाचा किस, कांदा, उडदाची डाळ, तांदूळ, मिरच्या, लसूण थोडे थोडे पाणी घालून पातळसर वाटून घ्यावे.
४. त्यामध्ये भाजेलेले दाणे घालावेत.
५. एका भांड्यात तेल गरम करून  मोहरी, हळद, हिंग ,कढीलिंब घालून थोडे परतून घ्यावे.
६. त्यात टोमाटोच्या फोडी घालून नीट मिक्स करा आणि थोडेसे शिजू द्या.
७. शिजलेल्या टोमाटोमध्ये कश्मिरी तिखट, लाल तिखट घालून नीट मिक्स करा. हा मसाला थोडा वेळ शिजू द्या.
८. आता वाटलेले नारळाचे मिश्रण ह्या टोमाटो मध्ये घालून २ मिनिटे परता.
९. ह्या मिश्रणात थोडे पाणी घालून मध्यम आचेवर उकळी येऊ द्यावी.
१०. चिमुटभर साखर आणि चवीनुसार मीठ घालून निट उकळू द्यावी.
११. गरम-गरम भाताबरोबर वाढा.
Tomato Aamti - टोमाटो आमटी Tomato Aamti - टोमाटो आमटी Reviewed by Prajakta Patil on January 25, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.