तीळ गूळ - Til Gul


लागणारा वेळ:
३०-४० मिनिट्स 
साहित्य:
  • १/२ किलो पॉलिश केलेले पांढरे तीळ 
  • १/२ पाव भाजून सोललेले शेंगदाणे 
  • १/२ किलो चिक्कीचा गूळ 
  • १/२ पाव डाळे 
  • १/२ वाटी खोबरा कीस 
  • ७-८ वेलदोडे पूड 
  • १/२ चमचा rose essence   
कृती:
१. तीळ भाजून घ्यावेत.
२. गूळ सोडून सर्व वस्तू एकत्र करून, त्याचे दोन भाग करावेत. गूळाचे पण दोन भाग करावेत.
३. जाड बुडाच्या पातेल्यात गूळाचे तुकडे टाकून gas वर ठेवावे. थोड्या वेळातच गूळ पातळ व्हायला सुरवात होते.
४. पातेल्यातील गूळ सतत हलवत राहावा म्हणजे पातेल्याच्या बुडाला चिकटणार नाही.
५. गूळ पातळ झाला कि त्यात १ चमचा तूप घालून, तिळाच्या मिश्रणाच्या १ भाग घालून, थोडे हलवून, तूपाचा हात लावलेल्या ताटात ओतावे आणि गरम असतानाच छोटे छोटे लाडू वळावेत.
६.लाडू वळताना जर मिश्रण थंड झाले तर परत गरम करून लाडू वळायला सुरुवात करावी.
६. अश्या प्रकारे तिळाच्या मिश्रणाच्या दुसऱ्या भागाचे लाडू करावेत.
७. थंड झाल्यावर हे लाडू कडक आणि कुरकुरीत होतात.

मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेछया !!!
तीळ गूळ - Til Gul तीळ गूळ - Til Gul Reviewed by Prajakta Patil on January 09, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.