Tandoori Fish - तंदुरी फिश

ओव्हन मध्ये बेक केलेला हा तंदुरी फिश थोडासा मसालेदार आणि  अतिशय चविष्ठ लागतो.  पापलेट ऐवजी दुसरा कोणताही मासा वापरून केलेला तंदुरी फिश हा तितकाच छान लागतो.

लागणारा वेळ :
३० मिनिटे
जणांसाठी :२- ३

साहित्य :
  • १ पापलेट 
  • १ चमचा लाल मिरचीची भुकटी
  • १ चमचा तिखट
  • १  चमचा आले-लसुण पेस्ट
  • १/२ चमचा जिरेपूड 
  • १  चमचा धने पूड 
  • १/२ चमचा गरम मसाला
  • १/२ लिंबाचा रस
  • १/२ कप दही
  • मीठ (चवीनुसार)
कृती :
१. प्रथम मासा निट साफ करून घ्यावा आणि त्याला उभ्या चिरा द्याव्यात.
२. एका भांड्यात मासे सोडून सर्व साहित्य एकत्र करावे.
३. हे मिश्रण माशाला केलेल्या चीरांमध्ये भरावे आणि कव्हर म्हणून वर लावावे.
४. हा मासा फ्रीजमध्ये साधारण तासभर ठेऊन द्या.
५. बेकिंग डिश तयार करून घ्या. ह्या डिशला खाली तेलाचा हात लावा.
६. डिशच्या बरोबर मध्यभागी भरलेला मासा ठेवा आणि वरून थोडे तेल सोडा.
७. ओव्हन ३५०F ला गरम करून त्यात मासा १५-२० मिनटे किंवा मासा पूर्ण शिजेपर्यंत ठेवा.
८. एका ओव्हल डिशमध्ये मध्यभागी बेक केलेला मासा ठेवावा आणि त्यावर गरम मसाल्याची पूड टाकून सर्व्ह करावे.
९. भोवताली कांद्याच्या व लिंबाच्या गोल चकत्या लावून शोभिवंत करावे.
Tandoori Fish - तंदुरी फिश Tandoori Fish - तंदुरी फिश Reviewed by Prajakta Patil on January 15, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.