Strawberry lemonade - स्ट्रोबेरी लेमोनेड


लागणारा वेळ: १५ मिनटे
जणांसाठी: २-३

साहित्य :
१ १/२ कप धुऊन कापलेल्या स्ट्रोबेरी
१ १/२ ताज्या लिंबाचा रस (अंदाजे ५ लिंबे)
१ कप साखर 
३ कप पाणी 
मीठ चिमुटभर 

कृती:
१. स्ट्रोबेरीचे देठ कापून, साखर, लिंबू रस आणि थोडे पाणी एकत्र करून मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी.
२. एका मोठ्याश्या मेटलच्या गाळणीने हा रस गळून घ्यावा.
३. गाळलेल्या रसात बाकीचे पाणी आणि चिमुटभर मीठ घालून नित मिक्स करा.
४. ग्लासात बर्फाचे खडे टाकून तयार स्ट्रोबेरी लेमोनेड सर्व्ह करा.
५. स्ट्रोबेरीचे आणि लिंबाचे काप करून सजवा.
Strawberry lemonade - स्ट्रोबेरी लेमोनेड Strawberry lemonade - स्ट्रोबेरी लेमोनेड Reviewed by Prajakta Patil on January 10, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.