लागणारा वेळ: २० मिनिटे
जणांसाठी: ५-६
साहित्य:
- पाव किलो सोयाबीन्स
- पाव किलो उकडलेले बटाटे
- १ जुडी निवडून बारीक चिरलेला पालक
- १/२ वाटी बारीक चिरलेली हिरवी मिरची
- १/४ वाटी आले-लसुन पेस्ट
- १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ चमचा धने-जिरे पूड
- १/२ चमचा हळद
- १ वाटी ब्रेडचा चुरा
- १/२ वाटी मैदा
- मीठ चवीनुसार
- तेल तळण्यासाठी
१. उकडलेले बटाटे सोलून, कुस्करून घ्यावेत.
२. एका भांड्यात थोडेसे पाणी घेऊन ते उकळत ठेवावे आणि सोयाबीन्स ह्या उकळत्या पाण्यात ५ मिनटे टाकावेत.
३. थंड झाल्यावर बाहेर काढून राहिलेले पाणी हाताने दाबून काढावे. आणि कुस्करून घ्यावेत.
४. एका मोठ्या भांड्यात कुस्करलेले बटाटे, सोयाबीन्स, पालक, मिरची, आले-लसुन पेस्ट, कोथिंबीर, धने-जिरे पूड, हळद घेऊन नित माळून घ्यावे.
५. मैद्यामध्ये थोडे-थोडे पाणी घालून पातळ पेस्ट करावी. मिश्रणात गुठळे होऊ देऊ नका.
४. कटलेटसाठी तयार केलेल्यातले थोडेसे मिश्रण हातावर घेऊन त्याला गोल किंवा अंडाकृती आकार द्यावा.
५. असे ५-६ गोळे तयार करून ५ मिनटे बाजूला ठेवावेत.
६. तयार झालेले गोळे एक-एक करून प्रथम मैद्याच्या मिश्रणात बुडवावेत आणि नंतर ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून तेलात तळण्यासाठी सोडावेत.
७. सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
८. गरम असतानाच कोथिंबीर चटणी किंवा tomato ketchup बरोबर सर्व करा.
Soya-Palak Cutlet - सोया-पालक कटलेट
Reviewed by Prajakta Patil
on
January 07, 2013
Rating:

No comments:
Post a Comment