Sol Kadhi - सोलकढी

कोकम (आमसूल/सोला) व नारळाचे दुध यापासून बनवलेली चवदार, ताजतवानं करणारी पाचक कढी. कोकणात बहुतांशी सर्व घरात आणि कोकणी/मालवणी हॉटेलात सुद्धा दुपारच्या जेवणात सोलकढी हमखास मिळते. जेवणात शेवटचा भात सोलकढी  ने जेवण्याची पद्धत आहे.

लागणारा वेळ: १५ मिनटे
जणांसाठी : ४-५

साहित्य:
  • १ खवलेला ताजा नारळ
  • ७-८ कोकमं
  • १ मिरची बारीक तुकडे केलेली
  • १ इंच आले - बारीक तुकडे करून किंवा किसून घ्या
  • १ चमचा कोथिंबीर - बारीक तुकडे करून
  • ४ लसूण पाकळ्या
  • थोडीशी मिरपूड
  • थोडीशी जीरा पूड
  • मीठ चवीनुसार

कृती:
१. एका पातेल्यात खोबऱ्याचा दुध हाताने पिळून घ्या.
२. खोबऱ्याच्या चोथ्यात अर्धा कप पाणी घालून पुन्हा एकदा पिळून घ्या.
३. त्यात बाकीच्या सर्व वस्तू:- कोकमं, मिरची, आले, कोथिंबीर, लसूण, एक चिमूट मीरपूड, एक चिमूट जिरापूड आणि चवी पुरतं मीठ टाकून मिश्रण चांगलं ढवळा आणि तासभर तसच ठेवा.
४. सोलकडी तयार.
५.गरमा-गरम भाताबरोबर सर्व्ह करा. किंवा नुसती प्या.

टीप: खोबऱ्याचा दुध मिक्सर मध्ये पण काढू शकता.
Sol Kadhi - सोलकढी Sol Kadhi - सोलकढी Reviewed by Prajakta Patil on January 10, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.