Pav Bhaji - पाव भाजी

महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थांपैकी पाव भाजी एक आहे. आणि पाव भाजी न आवडणारा एकही माणूस असेल असे मला वाटत नाही. पाव भाजी हा विविध भाज्या उकडून बनवलेला एक चटकदार पदार्थ आहे. मुंबई स्टाईल पाव भाजीची कृती खाली देत आहे. करून बघायला विसरू नका.

लागणारा वेळ :
४०-४५ मिनिटे
जणांसाठी :

साहित्य :
 • ४ मध्यम आकाराचे बटाटे
 • १ मोठा कांदा, बारीक चिरलेला
 • १ मोठी भोपळी मिरची, बारीक चिरून
 • ४ टोमाटो, चिरलेले 
 • १/४ किलो फ्लॉवर, चिरलेले 
 • १/४ वाटी मटारचे दाणे
 • २ चमचे आले-लसूण पेस्ट
 • २ चमचे पाव-भाजी मसाला
 • तेल
 • ३-४ हिरव्या मिरच्या, चिरलेल्या
 • मीठ (चवीनुसार)
 • ३ चमचे लोणी
 • १/२ चमचा लाल मिरची पावडर
 • १/४ चमचा हळद
 • पाव
 • कोथिंबीर
 • लिंबू 

कृती :
१. बटाटे,मटारचे दाणे ,फ्लॉवर ,टोमाटो आणि भोपळी मिरची पुरेसे पाणी घेऊन शिजवून घ्यावे. टोमाटो शिवाय सर्व भाज्या वेगवेगळ्या कुस्करून घ्याव्यात.
२. कढईत तेल गरम करून त्यामध्ये थोडासा कांदा टाकून तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा.
३. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची व आले-लसूण पेस्ट टाकून २-३ मिनिटे परतून घ्यावी.
४. कुस्करलेली भोपळी मिरची टाकून ३-४ मिनिटे शिजवून घ्यावे.
५. आता वरील मिश्रणात पाव भाजी मसाला,मीठ,साखर,हळद ,लाल मिरची पावडर एकजीव करुन घ्यावे. त्यामध्ये २ टोमाटो टाकून ५-७ मिनिटे शिजवून घ्या. शिजलेल्या टोमाटोला चमच्याने दाबून कुस्करा.
६. उरलेल्या २ टोमाटोची प्युरी तयार करावी.
७. आता मसाल्याच्या मिश्रणात बटाटा ,फ्लॉवर,भोपळी मिरची,मटारचे दाणे आणि टोमाटोची प्युरी टाकून मध्यम आचेवर ५-१० मिनिटे शिजवावे. सतत ढवळत राहावे.
८.gravy घट्ट व्हायला सुरवात झाली की gas बंद करून वरून कोथिंबीर भुरभुरावी. लिंबाच्या पातळ काप करून सजवावे.
९. कढईत लोणी पातळ करून घ्यावे आणि पावाच्या मधोमध काप देऊन लोणी लावावे. तव्यावर हलके सोनेरी होईपर्यंत भाजावे. 
१०. गरम गरम भाजी बरोबर तळलेले पावाचे तुकडे सर्व्ह करावे.
Pav Bhaji - पाव भाजी Pav Bhaji - पाव भाजी Reviewed by Prajakta Patil on January 18, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.