Methi, Palak,Maka Thepala - मेथी, पालक, मका थेपला

थेपला हा गुजराती लोकांचा अतिशय लोकप्रिय प्रकार. पालेभाज्या वापरून केलेला हा थेपला तुमच्या मुलांना नक्की द्या जर ती भाज्या खाण्यास कंटाळत असतील तर. थंडगार दह्याबरोबर हा गरमा-गरम थेपला किती स्वादिष्ट लागतो हे बनवून बघितल्याशिवाय कसे समजणार? म्हणून वेळ न दवडता पटकन थेपले करून बघा आणि मुलांना द्यायला विसरू नका.

लागणारा वेळ: २० मिनिटे
जणांसाठी: ३-४

साहित्य :
  • १/२ वाटी बारीक चिरलेली मेथी
  • १ वाटी बारीक चिरलेला पालक
  • २-३ हिरव्या मिरच्या, बारीक ठेचून
  • १/२ चमचा ओवा 
  • १/२ चमचा हळद 
  • १ चमचा'आले-लसूण पेस्ट 
  • तिखट, चवीनुसार
  • दोन वाट्या मक्याचे पीठ
  • मीठ (चवीनुसार)
कृती :
१. मेथी आणि पालक निवडून स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावा.
२. एका परातीमध्ये ही भाजी घेऊन त्यात हिरव्या मिरच्यांचा ठेचा, ओवा,तिखट, हळद, आले-लसुण पेस्ट, मीठ व मक्याचे पीठ घालावे.
३. प्रथम वरील मिश्रण पाण्याशिवाय मळावे. हळू-हळू लागेल तसे कोमट पाणी घेऊन पीठ भिजवावे.

४. चमचाभर तेल मिश्रणात घालून पीठ घट्ट मळून घ्यावे आणि १५-२० मिनिटे झाकून ठेवावे.
५. ह्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून प्लास्टिक वर ते थापून घ्यावेत.

६. तवा गरम करत ठेवा आणि एक-एक थेपला तव्यावर टाका.
७. एक बाजू अर्धी भाजून झाली कि उलटा आणि थोडेसे तेल लावा.
८. थेपला परत उलटून दुसऱ्या बाजूला सुद्धा थोडेसे तेल लावून घ्या.
९. दोन्ही बाजूने थेपला नीट भाजून झाला कि तव्यावरून काढा. अश्या प्रकारे बाकीचे थेपले करून घ्या.
१०. गरम-गरम थेपल्यावर तुपाची धार सोडून वाढा.
Methi, Palak,Maka Thepala - मेथी, पालक, मका थेपला Methi, Palak,Maka Thepala - मेथी, पालक, मका थेपला Reviewed by Prajakta Patil on January 25, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.