Matar Rabri - मटार रबडी


  
लागणारा वेळ : १ तास
जणांसाठी :
४ ते ५

साहित्य :
  • २ वाटी मटारचे दाणे 
  • ३ लिटर दुध
  • १/२ वाटी खवा
  • थोडेसे पिस्ता,बदामचे तुकडे
  • ३ वाटी साखर
  • १/४ वाटी तूप
  • ८-१० वेलच्यांची पूड 
  • दुधात भिजवलेल्या केशर काड्या 
कृती:
१. मटारचे दाणे  वाफवून घ्या .
२. थंड झाल्यावर, मिक्सरमध्ये मटारच्या दाण्याची पेस्ट करून घ्या .
३. एका मोठ्या भांड्यात तूप गरम करत ठेवा.
४. त्यात खवा आणि मटारची पेस्ट सोनेरी रंगाची होईपर्यंत परतून घ्यावी.
५. जाड  बुडाचे मोठे पातेले घेऊन त्यात दुध उकळत ठेवावे. एकदा दुधाला उकळी आली कि gas कमी करावा .
६. दुधावरती आलेली सगळी साय चमच्यानी एका बाजूला करावी. अशाप्रकारे जितक्या वेळा साय येईल ती सर्व पातेल्याच्या कडेला करावी.
७. कालांतराने हि एकत्र केलेली साय जाड व सुकी बनत जाते.
८. पातेल्यातील दुध होते त्याच्या १/४ होईपर्यंत उकळावे .
९. अशा उकळलेल्या दुधात मटारची पेस्ट, साखर, केशराच्या काड्या, बदाम, पिस्ते टाकावेत. टाकलेली साखर पूर्ण विरघळेपर्यंत दुध उकळवावे. वरून वेलची पूड टाकावी.
१०. gas बंद करून बाजूला काढलेली साय आटवलेल्या दुधात मिक्स करावी. मिक्स करताना जास्त ढवळू नये.
११. तयार झालेली मटार रबडी सेट होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवून द्या. Dessert म्हणून सर्व्ह करावी.
Matar Rabri - मटार रबडी Matar Rabri - मटार रबडी Reviewed by Prajakta Patil on January 08, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.