Green Peas Kachori - मटारची कचोरी

कुरकुरीत, चटकदार कचोरी करायची कृती खाली देत आहे. ह्या कचोऱ्या चिंचेची चटणी, हिरवी चटणी किंवा टोमाटो केच-अप बरोबर संध्याकाळी घरातल्यांना देऊन पसंतीची पावती मिळवा.  तुमचा अनुभव ऐकायला मला नक्कीच आवडेल.


लागणारा वेळ:
 ३०-४० मिनिटे
जणांसाठी: ४-५

साहित्य:
 • १/२ किलो मटार 
 • १/२ कप किसलेले सुके खोबरे 
 • २ चमचे जिरे पूड 
 • २ चमचे धने पूड 
 • १०-१५ लाल सुक्या मिरच्या 
 • १ चमचा गरम मसाला 
 • मीठ चवीनुसार 
 • साखर चवीनुसार 
 • २ मोठे चमचे तांदुळाचे पीठ 
 • २ मोठे चमचे गव्हाचे पीठ 
 • १ कप रवा 
 • ४  चमचे काळा मसाला 
 • तेल 
 • आले-लसूण पेस्ट
कृती:
१. २ चमचे तेल मोहनासाठी गरम करत ठेवा.
२. एका भांड्यात गव्हाचे पीठ, तांदुळाचे पीठ, रवा आणि चवीनुसार मीठ एकत्र करून निट एकजीव करा. पिठाच्या मध्यभागी खोलगट भाग करून त्यात कडकडीत तेल ओता.
३. गरजेप्रमाणे पाणी घेऊन घट्ट पीठ मळून घ्या. १५ मिनिटे बाजूला झाकून ठेवा.
४. धने पूड, जिरे पूड, काळा मसाला, गरम मसाला, आले-लसूण पेस्ट, लाल मिरच्या एकत्र वाटून घ्या.
५. एका भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा. पुरेसे गरम झाले कि त्यात हिंग, मोहरीची फोडणी करा. आणि वाटलेला मसाला त्यात  थोडा परता. एका प्लेट मध्ये काढून घ्या.
६. त्याच भांड्यात मटार परतून घ्या आणि वाटून घ्या. 
७. किसलेले सुके खोबरे लाल रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या. त्यात परतलेले मटार आणि वाटलेला मसाला घालून एकजीव करा. २-३ मिनिटे शिजवून घ्या.
८. मळून ठेवलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या.
९. त्यातील एक गोळा घेऊन त्याची पुरी लाटा. पुरीच्या बरोबर मधोमध सारण भरून त्याला काचोरीसारखा गोल आकार द्या. अशा रीतीने बाकीच्या गोळ्याची सुद्धा कचोरी  बनवून घ्या.
१०. कढई मध्ये तेल गरम करत ठेवा. आणि मध्यम आचेवर कचोऱ्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्या.
११. तयार गरम आणि कुरकुरीत कचोरी चटणी बरोबर सर्व्ह करा.
Green Peas Kachori - मटारची कचोरी Green Peas Kachori - मटारची कचोरी Reviewed by Prajakta Patil on January 18, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.