Grated Potato Thalipeeth - बटाट्याच्या किसाचे थालीपीठलागणारा वेळ
:१५ मिनिटे
जणांसाठी :४ ते५

साहित्य :
६ मध्यम आकाराचे बटाटे
४ मोठे चमचे लोणी
चवीपुरतं मीठ

कृती :
१. बटाटे स्वच्छ धुवून,साले काढून जाड किसणीवर किसा.
२.  त्यात चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करा.
३. Frying pan मध्ये लोणी घेऊन गरम करत ठेवा. आणि जस-जसे  लोणी वितळायला लागेल तसे दोन्ही pan च्या दोन्ही कडेला पसरावा.
४. मीठ घातलेला बटाट्याचा कीस त्यावर पसरवा.
५. लाकडी पलेत्याने त्याला गोल थापावा. साधारण १ इंच जाडीचा थालीपीठ असावा.
६. साधारण ५ मिनटे शिजवावा. शिजला नसेल तर परत थोड्यावेळ शिजवा.
७. साधारण शिजल्यावर एका ताटात थालीपीठ काढून घ्या.
८. Frying pan ला परत लोणी लावा आणि थालीपीठाची जी बाजू शिजली नाही ती बाजू लोण्यावर टाका.
९. मधला बटाटा शिजण्यासाठी pan वर झाकण घातले तरी कुरकुरीत होण्यासाठी शेवटची ५ मिनिटे उघडे ठेवा.
१०. गरम गरम थालीपीठ दही किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.
टीप :
आवडीप्रमाणे त्यामध्ये कांदा,parsley, जायफळ व मिरपूड,तांबडया मिरचीचे तुकडे घाला. थालीपीठाला एक वेगळीच चव येईल.
Grated Potato Thalipeeth - बटाट्याच्या किसाचे थालीपीठ Grated Potato Thalipeeth - बटाट्याच्या किसाचे थालीपीठ Reviewed by Prajakta Patil on January 10, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.