Eggless Carrot Cake - गाजर केक (अंड्याशिवाय)

ह्या weekend साठी special गाजराचा केक (अंड्याशिवाय) देत आहे. घरी बनवायला सोपा आणि तितकाच स्वादिष्ट. नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा.

वाचा गाजराचा केक (अंडे वापरून)


लागणारा  वेळ:
४०-५० मिनिटे
जणांसाठी:  ४-५

साहित्य:
 • १  कप गाजर, किसलेले 
 • मुठभर अक्रोड, कापलेले 
 • १/४ कप brown sugar 
 • ३/४ कप साखर 
 • १ चमचा vanilla essence 
 • १/२ कप बटर , वितळलेले 
 • १/२ चमचा मीठ 
 • १ १/२ चमचा बेकिंग पावडर 
 • १ चमचा दालचिनी पावडर 
 • १ १/४  कप मैदा  
 • १ १/२ बेकिंग सोडा 
 • १/४ कप दुध

कृती:
१. एका मोठ्या भांड्यात vanilla essence, बटर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मैदा, साखर,दालचिनी पावडर, दुध एकत्र करून एकजीव होइपर्यंत फेटा. साखर पूर्ण विरघलळी असली पाहिजे.
२. फेटलेल्या मिश्रणात किसलेले गजर आणि अक्रोड घालून नीट मिक्स करा.
३. ओव्हन ३२५ F ला preheat करून घ्या. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून घ्या आणि वरून थोडा मैदा भुरभुरा.
४. तयार केकचे मिश्रण केकच्या भांड्यात ओता. वरची बाजू सपाट करून घ्या.
५. केकचे मिश्रण ४५ मिनिटांसाठी १७० C ला भाजून घ्या.
६. केक तयार झाला कि नाही हे बघण्यासाठी केकमध्ये सुरी घालून बघा. सुरी जर clean बाहेर आली तर केक झाला असे समजावे.
७. Frosting करायचे असल्यास केक ला ५ मिनिटे थंड होऊ द्यावे. आणि मगच त्यावर frosting करावे.
८. Frosting  नसेल करायचे तर केक खाण्यासाठी तयार असेल.
९. वरून dryfruits चे कप टाकून सजवावे.
Eggless Carrot Cake - गाजर केक (अंड्याशिवाय) Eggless Carrot Cake - गाजर केक (अंड्याशिवाय) Reviewed by Prajakta Patil on January 24, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.