Dal-Bati - दाल बाटी

दाल बाटी हा राजस्थानमधील एक लोकप्रिय पदार्थ आहे. तुरीची डाळ आणि  गव्हाच्या पीठाचे भाजलेले लाडूसारखे गोळे असा हा प्रकार आहे. तयार दाल बाटी मग रवा लाडू, आंब्याची चटणी, भात पुदिना चटणी याबरोबर सर्व्ह करतात.

लागणारा वेळ: ६० मिनटे
जणांसाठी:

साहित्य (बाटी):
 • २ कप गव्हाचे पीठ
 • १/२ कप रवा 
 • १ चमचा ओवा 
 • २ चमचे तेल 
 • मीठ (चवीनुसार)

कृती (बाटी बनवण्याची):
१. परतीमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करा.
२. थोडे थोडे पाणी ह्या मिश्रणात ओता आणि जर घट्टसर कणिक मळून घ्या. २० मिनटे बाजूला झाकून ठेऊन द्या.
३. थोडे मिश्रण हातावर घेऊन त्याचा थोडा मोठा गोळा तयार करा. आणि मधोमध हलकेच दाब द्या. हवे असल्यास मिश्रणाच्या मध्ये पनीर, मटार किंवा बटाट्याचे मिश्रण भरा. अशा प्रकारे सर्व बाटी बनवून घ्या.
४. ओव्हन मध्ये बाटी शिजवणार असाल तर, ओव्हन ३५०F ला preheat करून घ्या. Silver foil वर किंवा direct ओव्हनच्या racks वर बाटी ठेऊन द्या.
५. ओव्हेन नसेल तर gas वर बारीक आचेवर बाटी ठेऊन द्या. दर ३-४ मिनिटांनी हलवत रहा म्हणजे सर्व बाजू नीट भाजल्या जातील.
.६. दोन्ही प्रकारे शिजवताना बाटीला सोनेरी रंग किंवा चिरा आल्या म्हणजे बाटी शिजली असे समजावे.
७. बाटी शिजल्या कि बाहेर काढून तुपात घोळवून घ्या.
८. गरमा-गरम डाळीबरोबर वाढा.

साहित्य (दाल):
 • १/२ चमचा मोहरी 
 • १/२ चमचा जिरे 
 • १ चमचा लाल तिखट 
 • १/२ चमचा हळद 
 • १/४ चमचा हिंग पावडर 
 • १ कांदा, बारीक चिरलेला 
 • १ टोमाटो, बारीक चिरलेला 
 • ४  हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या 
 • २ लसूण पाकळ्या, बारीक तुकडे करून 
 • १ कप शिजवलेली तूर डाळ 
 • १ चमचा कोथिंबीर, बारीक कापलेली 
 • मीठ (चवीनुसार)

कृती (दाल बनवण्याची):
१. एका भांड्यात तूप घेऊन मध्यम आचेवर पातळ करत ठेवा.
२. मोहरी, जिरे आणि कांदा ह्या तुपात टाकून थोडेसे परतावा.
३. आता हिरव्या मिरच्या आणि लसूण टाका.
४.  हे मिश्रण ३-४ मिनटे शिजवा.
५. थोडे झणझणीत बनवण्यासाठी थोडीसे लाल तिखट आणि अजून थोड्या हिरव्या मिरच्या घाला.
५. कांदा सोनेरी रंगाचा झाला कि हळद आणि हिंग पावडर घाला. निट मिक्स करा.
६. आता टोमाटो आणि १/४ कप पाणी घाला.
७. भांड्यावर झाकण ठेवा आणि २-३  मिनटे हे मिश्रण शिजू द्या.
८. टोमाटो शिजले कि शिजवलेली डाळ आणि चवीनुसार मीठ घालून ५ मिनटे शिजवा.
९. तयार डाळीवर चिरलेली कोथिंबीर घालून सजवा.
Dal-Bati - दाल बाटी Dal-Bati - दाल बाटी Reviewed by Prajakta Patil on January 11, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.