Rose Cookies - रोज कुकीज

साहित्य: 
  • १ कप मैदा
  • १ ३/४ कप तांदुळाचे पीठ
  • ३/४ कप साखर
  • नारळाचे दुध किंवा पाणी  (आवश्यकतेनुसार)
  • १ चमचा वेलची पावडर
  • मीठ (चवीनुसार)
  • तेल तळण्यासाठी
कृती :
१. मैदा, तांदुळाचे पीठ, वेलची पावडर, मीठ आणि नारळाचे  दुध/ पाणी एकत्र करा. पाणी/ नारळाचे दुध एकदम न ओतता थोडे थोडे ओता जेणेकरून थोडे पातळ राहील.
२. मिश्रणाला जास्त घट्ट ठेऊ नका. १५-२० मिनटे बाजूला ठेऊन द्या.
३. जाड बुडाच्या पातेल्यात तेल टाकून गरम करत ठेवा. गरम होत असलेल्या तेलात Rose-cookie मोल्ड ठेवा म्हणजे तो पण गरम होईल.
४. आता हा गरम झालेला मोल्ड तयार केलेल्या मिश्रणामध्ये ३/४ भरेल इतका बुडवा. आणि लगेच गरम होत असलेल्या तेलात टाका. साधारण ३०-४० सेकंड्स तसाच तेलात ठेउन द्या.
५. हलकेच मोल्ड हलवा म्हणजे cookie तेलात सुटेल. पण जर का cookie आपोआप सुटत नसेल तर चमच्याने हलकेच सोडायचा प्रयत्न करा.
६. सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने cookies तळून  काढा.
७. ह्या cookies थंड झाल्यावर कडक होतात.
८. अशाप्रकारे मोल्ड परत गरम करून घ्या आणि वरील कृती प्रमाणे बाकीच्या cookies तयार करा.
९. पूर्णपणे थंड झाल्यावरच खायला द्या.

टीप :  मोल्डवर मिश्रण नीट  चिकटण्याकरता, तो व्यवस्थित गरम असला पाहिजे. नाहीतर मिश्रण नीट चिकटत नाही. तसेच हा पदार्थ थोडा अवघड असल्याने पटकन जमत नाही. थोडी practice जरुरी आहे.


Rose Cookies - रोज कुकीज Rose Cookies - रोज कुकीज Reviewed by Prajakta Patil on December 03, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.