Rajgira Paratha with Paneer Stuffing - राजगिरा पनीर पराठा


लागणारा वेळ : २० मिनटे
जणांसाठी :
साहित्य:
  • २/३ कप ताजे किसलेले पनीर
  • १ १/३ चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट
  • १/३ चमचे पिठीसाखर 
  • १/३ चमचे लिंबू रस
  • २/३ कप राजगिरा पीठ
  • १/८ कप उकडून कुस्करलेल बटाटे
  • २ चमचे तूप
  • १/२ कप दही
  • मीठ चवीनुसार
कृती:
१. किसलेले पनीर, मिरची पेस्ट, लिंबू रस, मीठ, पिठीसाखर एकत्र करून घ्या.
२. वरील मिश्रणाचे ६ समान भाग करून घ्या आणि बाजूला ठेवा.
३. आता राजगिरा पीठ, बटाटे आणि मीठ एका भांड्यात घेऊन गरजेनुसार पाणी घालून मऊसर पीठ माळून घ्या.
४. मळलेल्या पीठाचे सुद्धा ६ समान भाग करा.
५. आता ह्या पिठाचा प्रत्येकी १ गोळा घेऊन तो थोडासा राजगिरा पिठात बुडवून साधारण ३ इंचापर्यंत लाटा.
६. लाटलेल्या गोळ्याच्या बरोबर मध्यभागी तयार केलेले मिश्रण भरून कडा एकत्र करून एक नवीन गोळा तयार करा.
७. परत थोडे राजगिऱ्याचे पीठ घेऊन साधारण ६ इंचाचा पराठा हलक्या हाताने लाटून घ्या.
८. नॉन-स्टीक तवा गरम करून त्यावर पराठा भाजून घ्या.
९. भाजताना दोन्ही बाजूला थोडे थोडे तूप लावून सोनेरी रंगाचा  होइतोवर खरपूस भाजून काढा.
१०. ह्याप्रमाणे बाकीचे पराठे तयार करा आणि उपासाच्या चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर खायला द्या.


Rajgira Paratha with Paneer Stuffing - राजगिरा पनीर पराठा Rajgira Paratha with Paneer Stuffing - राजगिरा पनीर पराठा Reviewed by Prajakta Patil on December 26, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.