Vegetable Soup - व्हेजिटेबल सूप

जणांसाठी:
लागणारा वेळ: ३० मिनिटे

साहित्य:

 • १ दुधी भोपळा (लहान) 
 • १ तांबडा भोपळा (लहान)
 • १ गाजर
 • थोडासा फ्लॉवर
 • थोडी कोबी
 • १ लहान बटाटा
 • १ कांदा
 • १ टोमाटो
 • १ चमचाभर वाटाणे
 • १ चमचा मैदा
 • १ चमचा लोणी
 • मिरपूड
 • मीठ(गरजेनुसार)
कृती:

१. तांबड्या भोपळ्याच्या फोडी चिमुटभर मीठ घालून जरा उकडून घ्याव्यात व बाजूला ठेवाव्यात.
२. सर्व भाज्या बारीक चिरून ५-६ कप पाणी घालून चांगल्या शिजवून व गाळून घ्याव्या.
३. नंतर त्यात मीठ व मिरपूड घालावी.
४. लोण्यावर मैदा भाजून त्यात हे तयार केलेले सूप घालावे.
५. सूप सर्व्ह करताना त्यात शोभेसाठी तांबड्या भोपळ्याच्या फोडी टाकाव्यात.
     नुसता कोबी किंवा नुसता फ्लॉवर त्याचेही असेच सूप करावे.
Vegetable Soup - व्हेजिटेबल सूप Vegetable Soup - व्हेजिटेबल सूप Reviewed by Prajakta Patil on October 01, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.