Stuffed Palak Katori - भरलेली पालक-कटोरी

 
लागणारा वेळ :  २०-२५ मिनटे
जणांसाठी: ३-४
साहित्य:
 • १ पालकाची जुडी 
 • १ वाटी कणीक 
 • १ वाटी मैदा 
 • १/२ वाटी रवा 
 • २  चमचे बेसन पीठ 
 • २ चमचे आले-लसूण पेस्ट 
 • तेल 
 • १ वाटी उकडलेले मूग आणि मटकी 
 • धने-जिरे पूड 
 • चाट मसाला 
 • चिंचेची चटणी 
 • बारीक शेव 
 • कांदा आणि कोथिंबीर 

पालक कटोरी करण्याची कृती:
१. पालक गरम पाण्यातून काढून मिक्सार्माडून फिरवून बारीक करून घ्यावा.
२. त्यात कणीक, रवा, मैदा, बेसन पीठ, ४ चमचे तेलाचे मोहन, मीठ, मिरची, आले-लसूण पेस्ट घालावे.
३. पीठ माळून घ्यावे.
४. त्याच्या पुऱ्या लाटून वाटीला चिकटवून, वाटीसाहित तळून घ्याव्यात. वाट्या नंतर आपोआप सुटतात.

हिरवी चटणी करण्याची कृती:
१. १ जुडी पुदिना, एक कांदा, मिरची, जिरे, मीठ, ३-४ लसूण  पाकळ्या मिक्सर मधून वाटून काढाव्यात. वरून लिंबू पिळावे.

सारण करण्याची कृती:
१. उकडलेल्या मुग-मटकी मध्ये मीठ, धने-जिरे पूड आणि चाट मसाला घालावा.
२. पालकाच्या कटोरी मध्ये हे सारण भरावे.
३. वरून हिरवी चटणी, चिंचेची चटणी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर व शेव घालावी.

टीप:
पालकाच्या तयार कटोऱ्या महिनाभर टिकतात.
Stuffed Palak Katori - भरलेली पालक-कटोरी Stuffed Palak Katori - भरलेली पालक-कटोरी Reviewed by Prajakta Patil on October 29, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.