Shrikhand - श्रीखंड

लागणारा वेळ : १ तास
जणांसाठी : ४-५
साहित्य :
 • २ किलो चक्का
 • २ किलो साखर
 • १ चमचा वेलदोडा पूड
 • १५-२० काड्या केशर
 • सुकामेवा
 • थोडेसे बेदाणे
कृती :
 1. प्रथम चक्का व साखर एकत्र कालवून चार तास ठेवावे.
 2. ते पुरणयंत्रातून फिरवून घ्यावं.
 3. थोड्या दुधात केशर भिजत घालावे व थोड्या दुधात केशरी रंग घालावा.
 4. नंतर हे रंगीत दुध व केशर चक्क्यात घालावे व हाताने मिश्रण सारखे करावे.
 5. योग्य त्या रंगाचे श्रीखंड झाले कि त्यात वेलदोड्यांची पूड व थोडे दुध घालून ढवळावे.
 6. थोडासा सुकामेवा श्रीखंडात घालावा.
 7. तयार झालेले सर्व श्रीखंड एका पातेल्यात काढून सुकामेवा वरून सजावटीसाठी पसरावा.
 8. श्रीखंड शक्यतो आदल्या दिवशी करून ठेवावे म्हणजे मुरल्यावर जास्त चविष्ट लागते.
टीप :
 • श्रीखंड शक्यतो घट्ट करू नये कारण ते वाढता ही येत नाही व चवीला ही विशेष चांगले लागत नाही.
 • ह्याच श्रीखंडात ताजे फळांचे (सफरचंद, चिकू, संत्र) तुकडे करून घातले तर fruit shrikhand तयार होते.
 • आम्रखंड करायचे झाल्यास, चक्का यंत्रातून फिरवताना एका किलोला ३०० gram रस घालावा.
Shrikhand - श्रीखंड Shrikhand - श्रीखंड Reviewed by Prajakta Patil on October 27, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.