Samosa - समोसा


जणांसाठी: ५ ते ६
लागणारा वेळ : ४५ मिनिटे

साहित्य:
 • ७-८ मध्यम आकाराचे बटाटे
 • ३-४ मध्यम आकाराचे कांदे
 • २ वाट्या उकडलेले मटार दाने
 • एक चमचा आल्याचा ठेंचा
 • १ चमचा लसणीच वाटण
 • २ चमचे मिरची वाटून
 • १ चमचा धने पूड
 • १ चमचा जिरे पूड
 • अर्धा चमचा  मीठ
 • अर्धी वाटी कोथिंबीर
 • १ चमचा  साखर
 • अर्धा  लिटर तेल
 • ६ वाट्या मैदा
 • १ वाट्या बारीक रवा
 • ३ चमचे कॉर्नफ्लोअर
 • २ चमचे साजूक तूप
कृती:

१. उकडलेल्या बटाट्याच्या अगदी बारीक फोडी कराव्यात.
२. कांदा बारीक चिरून घ्यावा.
३. एक वाटी तेलाची फोडणी करून त्यावर आलं,लसून,मिरचीचे  वाटण  परतून त्यावर कांदा गुलाबी होई पर्यंत परतावा.
४. नंतर उकडलेले मटार व  बटाट्याच्या फोडी घालाव्या  त्यात मीठ,साखर,लिंबू,धने,जिरं पूड घालून  ते निट परतावं.
५. खाली उतरून नंतर त्यात कोथिंबीर टाकावी आणि भाजी शक्यतो गार होऊन द्यावी.
६. रवा- मैदा,मीठ,साखर एकत्र करून त्यावर  कडकडीत तेलाचं मोहन घालावं.
७. पोळीच्या पीठा  इतपत साध्या पाण्यात सैलसर भिजवावं.
८. ते पीठ परातीत पसरून त्यावर कॉर्नफ्लोअर व साजूक तूप सगळीकडे पसरावं.
९. दोन पुऱ्याएवढं पीठ घेऊन त्याचा लांबट गोळा करून त्याची पट्टी लाटून घ्यावी.
१०. पट्टी मधोमध कापून दोन भाग करावेत.
११. एकेक पट्टी दाण्याच्या पुडीप्रमाणे गुंडाळून त्यात सारण भरावं.
१२. समोशाचं तोंड बंद करून मंद आचेवरच तळावेत.
Samosa - समोसा Samosa - समोसा Reviewed by Prajakta Patil on October 01, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.