Ratale kachori- रताळ्याची कचोरी


जणांसाठी :
लागणारा वेळ : ३० मिनिटे

साहित्य:
  • २५० ग्रॅम रताळी
  • १ मोठा बटाटा
  • मीठ(गरजेनुसार)
  • १ मुठ चिरलेली कोथिंबीर
  • १ वाटी खवलेले खोबरे
  • ४/५ हिरव्या मिरच्या
  • ५० ग्रॅम बेदाणा
  •  थोडी साखर
कृती :
१. प्रथम रताळे व बटाटे उकडून  घ्यावेत.
२. नंतर ते सोलून हाताने कुस्करून  त्यात थोड मीठ घाला.
३. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत.
४. नंतर  gas  वरून खाली उतरून  त्यात बाकीच्या वस्तू घालून सारण तयार करावे.
५. रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण भरून कचोऱ्या करून ठेवाव्यात.
६. त्या कचोऱ्या तुपात सोनेरी रंगांच्या होईपर्यंत तळाव्यात .
Ratale kachori- रताळ्याची कचोरी  Ratale kachori- रताळ्याची कचोरी Reviewed by Prajakta Patil on October 08, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.