लागणारा वेळ : २० मिनटे
साहित्य:
- २ कप राजगिरा पीठ
- १ केळे
- १ चमचा मिरची-आले पेस्ट
- मीठ (चवीनुसार)
- तेल (तळण्यासाठी)
- १ चमचा मोहरी
कृती :
१. एका भांड्यात राजगिऱ्याचे पीठ घेऊन त्यात केळे कुस्करून टाकावे.
२. आता त्यात मिरची-आले पेस्ट, मीठ, मोहरी घालून एकजीव करून घ्यावे.
३. आवश्यक तेवढे पाणी घालून पीठ नीट माळून घ्यावे.
४.एका कढई मध्ये तेल गरम करत ठेवावे.
५. एका प्लास्टिकच्या पिशवीला थोडे तेल लावून पुरी थापून घ्यावी.
६. आणि तेलात सोनेरी रानाची होईपर्यंत तळावी.
Rajgira-Banana Puri - राजगिरा आणि केळ्याच्या पुऱ्या
Reviewed by Prajakta Patil
on
October 18, 2012
Rating:

No comments:
Post a Comment