Paneer Bhurji Roll - पनीर भुर्जी रोल


लागणारा वेळ : तास
जणांसाठी : -
साहित्य :
 • / किलो मैदा
 • २० ग्रॅम यीस्ट
 • चमचा साखर
 • वाटी दुध
 • मीठ(चवीनुसार)
 • तूप
 • पाणी(आवश्यक्तेनुसार)
 • पाव किलो किसलेले पनीर
 • वाट्या बारीक चिरलेला कांदा, टोमाटो
 • चमचे आल, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट
 • चमचे गरम मसाला
 • कोथिंबीर
 • तेल
कृती :

. मैदा,यीस्ट,मीठ,साखर,दुध,दोन चमचे तेल एकत्र करून जरुरीपुरतं पाणी घालून कणकेपेक्षा सैलसर पीठ  भिजवावे.
पंधरा मिनिटे ओल्या रुमालाखाली झाकून उबदार जागी ठेवावं.
. पाव वाटी तेलावर कांदा,टोमाटो परतावा आणि त्यात किसलेलं पनीर, मीठ चिरलेली कोथिंबीर घालून भुर्जी तयार करून घ्यावी.
. रोलसाठी भिजवलेलं पीठ फुगून दुप्पट होतं. त्यांचे एकसारख्या आकाराचे वीस गोळे करावे.
. प्रत्येक गोळा लांबट पुरीच्या आकारात लाटून वर पनीरची भुर्जी पसरावी.
. पुरीच्या उभ्या कडा एकावर एक ठेवून रोल तयार करावा.
. रोलची मिटवलेली बाजू तूप लावलेल्या ट्रेमध्ये खाली येईल अशी ठेवावी.आणि वरच्या बाजूला कापून टाकावे.
. याप्रमाणे ट्रेमध्ये एक एक  रोल ठेवून दहा मिनिटे परत ओल्या रुमालाखाली ठेवावे.
. दोनशे सेंटीग्रेडला १०-१५ मिनिटे खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत बेक करावे.
१०. नंतर वरून त्यावर तुपानं ब्रशिंग करावं.

टीप : 
 • हवे असल्यास सिमला मिरची, baby corn, कोबी ह्या भाज्यांचे पातळ काप करून ते पण तेलात परतून ह्या रोल मध्ये घालू शकता.  
 • तसेच मैद्या ऐवजी गव्हाचे पीठ वापरून पण हा रोल तयार करता येऊ शकतो.
Paneer Bhurji Roll - पनीर भुर्जी रोल Paneer Bhurji Roll - पनीर भुर्जी रोल Reviewed by Prajakta Patil on October 28, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.