Oats Pakoda - ओट्स पकोडा

लागणारा वेळ: २० मिनटे
साहित्य :

 • १ कप ओट्स
 • १/३ कप गरम पाणी
 • २ चमचे तांदुळाचे पीठ
 • २ चमचे बेसन पीठ
 • थोडे बारीक कापलेली कढीपत्त्याची पाने
 • १ कांदा, बारीक कापलेला
 • कोथिंबीर, बारीक कापलेली
 • ४-५ हिरव्या मिरच्या
 • छोटा आल्याच्या तुकडा
 • २-३ लसून पाकळ्या
 • पाव चमचा हळद
 • पाव चमचा लाल तिखट
 • मीठ, चवीनुसार
 • तेल तळण्यासाठी

कृती :
१. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात ओट्स भिजवा आणि ५ मिनटे तसेच राहू द्या थोडे हलवून मिश्रण थोडे घट्ट होऊ द्यावे, जसे आपण नेहमीच्या पकोड्यासाठी करतो तसे.
२. आले, मिरच्या आणि लसून वाटून घ्या.
३. आता वरील सर्व साहित्य (तेल सोडून) एक एक करून ओट्स च्या मिश्रणात टाका. आणि नीट एकजीव करा.
४. जर मिश्रण कोरडे वाटत असेल तर त्यात थोडे गरम पाणी घालावे.
५. कढई मध्ये तेल ओतून गरम होऊ द्यावे.
६. आता हाताने किवा चमच्याने छोटे छोटे पकोडे तेलात सोडा.
७. मंद आचेवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.

गरम गरम ओट्स पकोडे टोमाटो केच-अप/ चटणी बरोबर वाढा.
Oats Pakoda - ओट्स पकोडा Oats Pakoda - ओट्स पकोडा Reviewed by Prajakta Patil on October 16, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.