Kacchya Kelyache Dahivade - कच्च्या केळ्याचे दहीवडे

लागणारा वेळ : ३० मिनिटे
जणांसाठी :
साहित्य :

 • १ डझन कच्ची केळी
 • पाऊण वाटी वऱ्याचं अगर शिगाड्याचं पीठ
 • राजगिऱ्याचं पीठ
 • आर्धी वाटी दाण्याचा कुट
 • १०-१२ हिरव्या मिरच्या
 • खाण्याचा सोडा
 • साखर
 • जिऱ्याची पूड
 • तीन वाट्या दही
 • कोथिंबीर
 • मीठ (चवीनुसार)

कृती :
१. केळी सोलून कुकरमध्ये उकडून घ्यावी.
२. थंड झाल्यावर वाटून त्यात जिरंपूड,चवीप्रमाणे मीठ व वाटलेल्या मिरच्या घालाव्यात.
३. या मिश्रणाचे गोल चपटे वडे करून घ्यावेत.
४. वरी किंवा शिंगाडा आणि राजगिऱ्याचं पीठ पाण्यात घालून पातळ करावं आणि तयार केलेले वडे या पिठातून बुडवून काढून तळावेत.
५. तळलेले वडे पाण्यात घालून बाहेर काढून हलक्या हाताने दाबून पाणी काढून टाकावं.
६. दही थोडं घुसळून घेऊन त्यात वाटलेलं आलं,साखर,मीठ,चिरलेली कोथिंबीर घालावी.
७. नंतर तयार केलेले वडे या दह्यात सोडावेत.

नेहमीच्या दही वड्यांप्रमाणे थोडं लाल तिखट, चाट मसाला वरून भुरभुरून serve करावेत.
Kacchya Kelyache Dahivade - कच्च्या केळ्याचे दहीवडे Kacchya Kelyache Dahivade - कच्च्या केळ्याचे दहीवडे Reviewed by Prajakta Patil on October 25, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.