Fish Soup - फिश सूप

जणांसाठी:
लागणारा वेळ: ३० मिनिटे

साहित्य :
 • १/२  किलो फिश
 • १ कांदा
 • ३ मोठे टोमाटो
 • २ लसूनच्या  पाकळ्या
 •  थोडी कोथिंबीर
 • १/४ चमचा तिखट
 • १/४ चमचा मिरपूड
 • मीठ (गरजेनुसार)
 • लोणी
 • किसलेले चीझ
 • ३ कप पाणी
 • चिमुटभर केशर 
कृती :

१. प्रथम २ चमचा लोण्यावर बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.
२. त्यात बारीक चिरलेले टोमाटो,लसून,कोथिंबीर,मीठ,मिरपूड घालावी.
३. ते थोडे परतून त्यात फिशचे तुकडे घालून सतत हलवत राहावे.
४. नंतर त्यात ३ कप गरम पाणी घालावे व फिश  चांगले शिजल्यानंतर  जरूर वाटल्यास त्यात थोडे पाणी घालावे.
५. त्यात केशर घालून ते १५ मिनिटे चांगले शिजल्यावर सूप गाळून घ्यावे व गरम गरम सर्व्ह करावे .
६. सर्व्ह करताना त्यात थोडे किसलेले चीझ व तळलेले ब्रेडचे तुकडे घालावेत .
Fish Soup - फिश सूप Fish Soup - फिश सूप Reviewed by Prajakta Patil on October 02, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.