Custard Apple Ice Cream - सीताफळ आईस्क्रीम
जणांसाठी:
साहित्य:
  • २ लिटर दुध
  • १ किलो सीताफळ
  • १ वाटी साखर
  • १ वाटी क्रीम
  • २ चमचे कॉर्न फ्लोअर
  • २ चमचे चायना ग्रास
कृती:
१. सीताफळाचा गर काढून घ्या.
२. २ लिटर  दुध आटवून १ लिटर करा.
३. नंतर  कॉर्न फ्लोअर व चायना ग्रास  मिसळून  उकळत्या दुधात  ओता.
४. चांगले उकळल्यावर gas बंद करा व साखर घाला.
५. दुध थंड  झाल्यावर सीताफळाचा अर्धा गर वाटून व अर्धा गर न वाटताच घालावा .
६. चमच्याने ढवळून एका भांड्यात ओतून फ्रीझर मध्ये सेट व्हायला ठेवा.
७. आईस्क्रीम सेट झाल्यावर पुन्हा मिक्सरमध्ये घुसळून घ्या व फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवा.
Custard Apple Ice Cream - सीताफळ आईस्क्रीम Custard Apple Ice Cream - सीताफळ आईस्क्रीम Reviewed by Prajakta Patil on October 03, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.