Coconut Laddu - नारळाचे लाडू


जणांसाठी :

लागणारा वेळ : ३० मिनिटे

साहित्य:
  • २ वाट्या खवलेला नारळ
  • २ वाट्या पिठी साखर
  • १ वाटी वरीचे तांदूळ
  • थोडी वेलची पावडर 
  • काजू
  • मनुका 
  • १/२ तूप

कृती :
१. प्रथम वरीचे तांदूळ तव्यावर  गरम करून मिक्सर मध्ये बारीक करावे.
२. नंतर ओले खोबरे तुपावर खमंग भाजून घ्यावे.
३. खोबरे भाजल्यावर त्यात बारीक केलेले वरीच्या तांदळाचे पीठ घालावे.
४. नंतर त्यात  पिठी साखर घालून सर्व एकजीव करावे.
५. त्यात वेलची पावडर,काजू,मनुका घालावे.
६. वरून त्यात गरम तूप घालावे.
७. हाताला थोडे तूप चोळून घ्या. आणि लाडू वळा.

टीप: हे लाडू खूप मऊ असतात थोडा टणकपना येण्यासाठी ते airtight container मध्ये ठेवून फ्रीझ मध्ये साधारण तासभर ठेऊन द्या.
Coconut Laddu - नारळाचे लाडू Coconut Laddu - नारळाचे लाडू Reviewed by Prajakta Patil on October 10, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.