Chocolate Shrikhand - चोकलेट श्रीखंड

लागणारा वेळ: १५ मिनटे , श्रीखंड सेट होण्यासाठी : १ तास
जणांसाठी:
साहित्य:
  • १ कप चक्का
  • ३/४ कप पिठीसाखर
  • २ केशराच्या कांड्या (२ चमचे दुधात मिक्स केलेल्या)
  • १/२ कप वितळवलेले चोकलेट
  • १/२ कप क्रीम
  • सुकामेवा (पातळ काप)
कृती :
१. वितळवलेले चोकलेट चांगले फेटून घ्या. आणि एका मोठ्या भांड्यात त्यातले अर्धे काढून घ्या.
२. त्यात अर्धे क्रीम टाकून परत चांगले फेटून घ्या.
३. आता वरील मिश्रणात चक्का आणि पिठीसाखर टाकून चांगले एकजीव करा. उरलेले अर्धे क्रीम आणि केशरमिश्रित दुध टाकून चांगले फेटून घ्या.
४. हे मिश्रण १ तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेऊन द्या.
५. साधारण तासाभराने चोकलेट श्रीखंड तयार झाले क बाहेर काढून वाटी मध्ये सर्व करा.
६. सजावटीसाठी उरलेले अर्धे वितळलेले चोकलेट ओता आणि सुकामेव्याचे काप वरून भुरभुरा.
Chocolate Shrikhand - चोकलेट श्रीखंड Chocolate Shrikhand - चोकलेट श्रीखंड Reviewed by Prajakta Patil on October 23, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.