Chocolate Lassi - चॉकोलेट लस्सी

लागणारा वेळ: १० मिनटे
जणांसाठी: २-३
साहित्य:
  • २०० ग्रॅम जाड थंड दही 
  • २ चमचे पाणी 
  • १०० ग्रॅम dark chocolate तुकडे 
  • २ चमचे कोको पावडर 
  • सुक्यामेव्याचे उभे पातळ काप 
  • २ चमचे साखर (किंवा चवीनुसार)
  • चिमुटभर मीठ 
  • बर्फाचे तुकडे 

कृती:
१. chocolate chunks, कोको पावडर एकत्र करून त्यात २ चमचे पाणी टाकून gas/microwave मधे वितळवून घ्या.
२. वितळलेले मिश्रण थंड होऊ द्या.
३. आता हे वितळलेले chocolate चे मिश्रण, थंड दही, साखर, मीठ, थोडे बर्फाचे तुकडे एकत्र करून मिक्सर मधून फिरवून एकजीव करून घ्या,
४.फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेऊन द्या.
५. सर्व्ह करताना सुक्यामेव्याचे पातळ काप वरून पसरवून काचेच्या ग्लास मध्ये द्या.

 
Chocolate Lassi - चॉकोलेट लस्सी Chocolate Lassi - चॉकोलेट लस्सी Reviewed by Prajakta Patil on October 29, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.