Chicken Tandoori - चिकन तंदुरी

लागणारा वेळ : १ तास
जणांसाठी : ३ - ४

साहित्य :
 • ८ मोठे चिकन लेग पीस 
कोटिंगसाठी साहित्य: 
 • ३ चमचे आले-लसूण पेस्ट 
 • २ चमचे चाट मसाला 
 • १ चमचा तेल 
 • ३ चमचे दही 
 • १/२ लिंबाचा रस 
 • ४ चमचे लाल तिखट पेस्ट 
 • ३/४ चमचे हळद 
 • १ १/२ चमचा लाल खायचा रंग 
 • २ दालचिनीच्या काड्या 
 • ५ हिरव्या वेलच्या 
 • ३ ब्राउन वेलच्या 
 • २ चमचे धने 
 • २ चमचे जिरे 
 • ३ लवंग 
 • १ तमालपत्र 
कृती:
१. चिकन स्वच्छ धुऊन, त्याला २ - ३ उभ्या चिरा द्या. 
२. एका मोठ्या भांड्यात, लिंबू रस, लाल तिखट पेस्ट, दही, तेल, आले-लसूण पेस्ट, चाट मसाला, खायचा लाल रंग, मीठ आणि तंदूरी मसाला घेऊन नीट एकजीव करा. 
३. वरील मसाला चिकनला नीट कोट करा. चिरा नीट भरून घ्या. 
४. कोट केलेलं चिकन ३० मिनिटे तसेच मुरण्यासाठी ठेवून द्या. 
५. ओव्हन २५० डिग्री C ला गरम करा. चिकन २० - ३० मिनिटे भाजून काढा. 
६. लिंबूचे आणि कांद्याचे काप सजवून खायला द्या. 

तंदूर मसाला कृती :
१. कढईत वेलच्या, धने, जिरे, दालचिनी, हळद, लवंग, तमालपत्र भाजून घ्या. 
२. थंड झाले कि मिक्सर मधून बारीक वाटून काढा. 
३. हा झाला तंदूर मसाला तयार. 
Chicken Tandoori - चिकन तंदुरी Chicken Tandoori - चिकन तंदुरी Reviewed by Prajakta Patil on October 28, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.