Carrot Halwa - गाजर हलवा

जणांसाठी :
लागणारा  वेळ : ३० मिनिटे 


साहित्य:
  • १ किलो गाजरे
  • ३०० ग्रॅम साखर
  • १ कप पाणी
  • २५० ग्रॅम खवा
  • १० ग्रॅम वेलदोड्यांची पूड
  • २५ ग्रॅम काजू
  • १० ग्रॅम पिस्ते
  • १० ग्रॅम बदाम
  • १२५ ग्रॅम डालडा
कृती:
१. प्रथम सर्व गाजरे किसून घ्यावी आणि नंतर त्यात तूप टाकून परतावी.
२. त्यावर झाकण ठेवून ती वाफेवर शिजू द्यावीत.
३. दुसऱ्या पातेल्यात साखरेत २ कप पाणी घालून पाक तयार करावा.
४. खवा तुपात जरा परतून घ्यावा व तो पाकात घालावा.
५. नंतर त्यात गाजराचा किसलेला कीस घालावा.
६. मिश्रण घट्ट झाले कि त्यात वेलची पूड व काजू घालावेत.
७. नंतर तूप लावलेल्या भांड्यात ओतावे आणि वरती बदाम पिस्त्याचे काप लावावेत.
Carrot Halwa - गाजर हलवा Carrot Halwa - गाजर हलवा Reviewed by Prajakta Patil on October 08, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.