Carrot Gulabjamun - गाजर गुलाबजाम

लागणारा वेळ: ३० मिनटे
जणांसाठी: ५-६

साहित्य :
  • १/२ किलो गाजर
  • १/२ किलो खवा
  • १/२ किलो साखर 
  • ८ चमचे कॉर्नफ्लोअर
  • अडीच कप पाणी 
  • १ चमचा वेलची पूड 
  • २ चमचे बारीक  रवा
  • तूप किंवा तेल (तळण्याकरता)
कृती :
१.गाजर सोलून किसून घ्यावीत आणि कुकरमध्ये शिट्टी न लावता दहा मिनिट शिजवून घ्यावी.
२.शिजलेल्या किसातून पाणी काढून टाकावं व खवा आणि कॉर्नफ्लोअर घालून चांगल मळून एकजीव करावं.
३. या मिश्रणाचे एकसारख्या आकाराचे गोळे करून मंद आचेवर तुपात किंवा तेलात तळून घ्यावे.
४.साखरेचा पाक करून त्यात  त्यात वरील तळलेले गुलाबजामून टाकून पाकला एक उकळी आणावी.
५. पौष्टिक गुलाबजामून तयार.
टीप : गाजराच्या ऐवजी मटार, कॉर्न, दुधी भोपळा वापरला तरी हे गुलाबजामून चविष्ट होतात.
Carrot Gulabjamun - गाजर गुलाबजाम Carrot Gulabjamun - गाजर गुलाबजाम Reviewed by Prajakta Patil on October 25, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.