Bottle Gourd Burfi - दुधीची बर्फी

लागणारा वेळ : ३० मिनटे
जणांसाठी :
साहित्य:
  • २ कप किसलेला दुधी
  • १ लिटर दुध
  • १ कप खवा
  • १/२ कप साखर
  • १ चमचा वेलची पावडर
  • बारीक कापलेला सुका मेवा
कृती:
१. जाड बुडाच्या पातेल्यात दुध आणि दुधी घालून उकळावावा.
२. दुध अर्धे झाले की त्यात साखर घालावी.
३. मिश्रण जाडसर होईपर्यंत सारखे हलवत राहा म्हणजे खाली चिकटणार नाही.
४. वरील मिश्रणात खवा घालून चांगले एकजीव करून घ्या.
५. पाणी सुटायला लागले की आधीच तुपाचा हात लावून ठेवलेल्या aluminium च्या भांड्यात हे मिश्रण ओता.
६.वेलची पावडर टाकून वरची level चमच्याने एकसारखी सपाट करून घ्या. आणि त्यावर बारीक कापलेला सुका मेवा भुरभुरा.
७.मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवा.
८.साधारण तासाभराने बाहेर काढून चौकोनी तुकड्यात बर्फी कापा.
Bottle Gourd Burfi - दुधीची बर्फी Bottle Gourd Burfi - दुधीची बर्फी Reviewed by Prajakta Patil on October 18, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.