Basundi - बासुंदी

लागणारा वेळ : १.३० तास
जणांसाठी : ५ - ६
साहित्य :

  • ४ लिटर दुध
  • २ ते ३ वाट्या साखर
  • १०-१५ वेलदोड्यांची पूड
  • ५० ग्रॅम बेदाणे
  • १० ग्रॅम सुकामेवा
  • थोडेसे केशर,जायफळ पूड
कृती :
१. जाड बुडाच्या पातेल्यात दुध तापायला ठेवावे.
२. आटवलेले दुध दाट आणि किंचित बदामी रंगाचे असले पाहिजे.
३. नंतर त्यात साखर घालून सतत ढवळत राहावे.त्यामुळे दुध खाली लागणार नाही.
४.  साखर विरघळली की त्यात वेलची, जायफळ पूड, केशर आणि बेदाणे घालून ढवळावे.
५. सर्वात शेवटी त्यात सुक्यामेव्याचे पातळ काप सजावटीसाठी घालावेत.

 हि बासुंदी आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवून गार केल्यास अजून चविष्ट लागते.
 बासुन्दीमध्ये सीताफळ बासुंदी आणि द्राक्ष्याची बासुंदी असे प्रकार पण लोकप्रिय आहेत.

टीप :
 दुध आटवायला स्टीलचे पातेले घेवू नये, जाड बुडाचे घ्यावे.
Basundi - बासुंदी Basundi - बासुंदी Reviewed by Prajakta Patil on October 27, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.