जणांसाठी : ४
लागणारा वेळ : ३० मिनिटे
साहित्य :
- ८ केळी(साधारण पिकलेली)
- ५०० ग्रॅम साखर
- ८० ग्रॅम तूप
- १०-१२ वेलदोडे
१. प्रथम केळी सालासकट वाफवून घ्या.
२. नंतर गरम आहे तेव्हाच त्यांचा लगदा करावा.
३. साखरेत थोडे पाणी घालून पाक करावा.
४. पाक तयार झाल्यावर त्यात केळ्यांचा लगदा घालून ढवळावे.
५. मिश्रण कडेने सुटू लागले कि त्यात तूप सोडावे.
६. गोळा घट्ट झाला कि पोळपाटाला तूप लावून त्यावर थापावा व त्याच्या वड्या पाडाव्यात.
Banana Vadi - केळाच्या वड्या
Reviewed by Prajakta Patil
on
October 09, 2012
Rating:

No comments:
Post a Comment