Bradche Gulabjamun - ब्रेडचे गुलाबजाम


जणांसाठी:

लागणारा वेळ : ३० मिनिटे

साहित्य :
  • ब्रेडच्या १०-१२ स्लाइस
  • अर्धी वाटी दुध
  • १ वाटी पाणी
  • पावणेदोन वाट्या साखर
  • वेलचीपूड
  • तेल (गरजेनुसार)
कृती:

१. ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून ते ब्रेड कुस्करा.
२. त्यामध्ये थोडेसे दुध घालून ब्रेड मळून घ्या.
३. नंतर साखर व पाणी एकत्र करून साखर विरघळेपर्यंत उकळी आणा आणि पाक तयार करून घ्या.
४. नंतर मळलेल्या ब्रेडचे छोटे छोटे गोळे करून मंद आचेवर तळून घ्या.
५. नंतर गरम गरम गोळे पाकात घाला.

                  एकदा तरी हे वेगळे आणि झटपट होणारे ब्रेडचे गुलाबजामून करून पहा.
Bradche Gulabjamun - ब्रेडचे गुलाबजाम Bradche Gulabjamun - ब्रेडचे गुलाबजाम Reviewed by Prajakta Patil on September 29, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.