Matar Chakali - मटार चकली


जणांसाठी:
लागणारा वेळ : ४० मिनिटे

साहित्य :
• २ वाट्या गव्हाचे पीठ
•ओवा आणि तीळ
•जिरे
•मिरचीचा ठेचा
•१ वाटी मटारची पेस्ट
•मीठ (चवीनुसार )

कृती:
१.प्रथम गव्हाच्या कणकेमध्ये तीळ ओवा आणि जिरे घालून,एका कापडात घालून,हे पीठ १५ मिनिटे कोरडे वाफवून घ्यावे.
२.फडक्या मधून काढून पीठ मोकळ करून त्यामध्ये मटारची पेस्ट,तीळ, पाणी,मिरचीचा ठेचा व मीठ घालून पीठ मळून घ्यावे.
३.तयार पीठ चकलीच्या साऱ्यामध्ये घालून चकल्या पाडाव्यात व खुसखुशीत तळून घ्याव्या.

Matar Chakali - मटार चकली Matar Chakali - मटार चकली Reviewed by Prajakta Patil on September 04, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.