अंड्याचा हलवा (Oven Baked Egg Halva)


लागणारा वेळ : १५ मिनटे (ओव्हनमध्ये - ३० मिनटे)
जणांसाठी : ६
साहित्य:
  • ६ अंडी (पिवळे आणि पांढरे वेगळे केलेली)
  • १ कप साखर
  • १ कप खवा
  • १/२ चमचा बारीक कापलेले बदाम
  • केशर (थोडेसे)
  • १/२ चमचा बारीक केलेली हिरवी वेलची
  • १/२ चमचा vanilla essence
  • १ चमचा दुध
  • १ चमचा बटर
कृती :
१. ९ इंच केकच्या डब्याला बटर लावून घ्या.
२. दुधात केशर घोळवून घ्या
३. एका मोठ्या बाउल मध्ये अंड्याचा बलक आणि साखर फेटून घ्या.
४. आता ह्या मिश्रणामध्ये खवा मिक्स करा. आणि थोडावेळ फेटून घ्या.
५. एका दुसऱ्या बाउल मध्ये अंड्याचे पांढरे फेटून घ्या. आणि ते मिश्रण अंड्याच्या पिवळ्या मिश्रणामध्ये मिक्स करा.
६. आता हे मिश्रण बटर लावलेल्या डब्यात ओता.
६. ओव्हन ३५० d/f ला गरम करून घ्या.
७. अर्धा तास भाजून घ्या. काढताना एखादी सुरी पदार्थात टाकून ती बाहेर काढा. ती clean बाहेर आली तर पदार्थ झाला आहे असे समजावे.
८. थोडे थंड झाल्यावर सुरीने चौकोनी तुकडे करा. आणि सर्व करा.
अंड्याचा हलवा (Oven Baked Egg Halva) अंड्याचा हलवा (Oven Baked Egg Halva) Reviewed by Prajakta Patil on August 28, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.