Dry Crispy Chicken


लागणारा वेळ : Cooking Time : १० मिनटे Preparation Time : १ तास
जणांसाठी :

साहित्य:

 • १ किलो बोनेलेस चिकन (२ १/२ इंचाचे तुकडे करून)
 • ४ अंडी
 • २ कप ब्रेडचा चुरा
 • ४ चमचे लसून पेस्ट
 • ४ चमचे तिखट
 • २ चमचे जीरा पावडर
 • ४ चमचे कोथिंबीर
 • २ चमचे दालचिनी पावडर
 • २ चमचे मैदा
 • २ चमचे लिंबाचा रस
 • तेल तळण्यासाठी

कृती:

१. चिकन नीट धुऊन कोरडे करून घ्या.
२. काटा चमच्याने त्यावर टोचे मारा.

३. एका बाउल मध्ये लसून पेस्ट
, तिखट, जीरा पावडर, कोथिंबीर, दालचिनी पावडर,लिंबाचा रस एकत्र करून घ्या.
४. ह्यात चिकन घोळवून तास-२ तास ठेऊन द्या.

५. मीठ आणि तिखट घालून अंडी फेटून घ्या.

६. ब्रेडचा चुरा एका प्लेट मध्ये घ्या. प्रत्येक चिकनचा तुकडा पहिले ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून नंतर अंड्यात घोळवा.

७. आणि परत तो ब्रेडच्या चुऱ्यात घोळवा. ह्यामुळे चिकन ला
double coat मिळेल.
८. तेलावर
golden रंगाचे होईपर्यंत fry करा.
. गरम गरम सर्व करा.

Dry Crispy Chicken Dry Crispy Chicken Reviewed by Prajakta Patil on August 29, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.