Chocolate Dosa - चोकलेट डोसा


लागणारा वेळ : डोश्यासाठी ३-४ मिनटे
जणांसाठी : ४-५

डोसा साहित्य:
  • १ कप तांदूळ
  • १ कप उडीद डाळ
  • १/२ चमचा मेथीचे दाने
  • तेल - डोसे बनवण्यासाठी
  • ३ चमचे चोको पावडर, किवा कोणतेही आवडते चोकलेट (वितळवून)
  • आईसिंग शुगर ३ चमचे
  • सुकामेवा
  • बटर

कृती :
१. तांदूळ आणि उडीद डाळ व मेथी वेगवेगळे ५-७ तास पाण्यात भिजवावेत.
२. तांदूळ आणि डाळ, मेथी मधील पाणी काढून टाकावे व मिक्सर मध्ये बारीक वाटून घावे. वाटताना गरजेपुरते पाणी घालावे.
३. वाटलेला तांदूळ आणि डाळ एकत्र करून ८-१० तास झाकून ठेवावे. म्हणजे ते व्यवस्थित आंबेल.
४. मिश्रण थोडे पातळ असावे म्हणजे डोसे कुरकुरीत होतात.
५. एका बाउल मध्ये चोको पावडर आणि आईसिंग शुगर एकत्र करून बटर घालावे. आणि चांगले फेटून घ्यावे. गुठळ्या होऊ देऊ नका.
६. ह्या मिश्रणात सुकामेवा घालून एकजीव करा. मिश्रण थोडे जाडसर ठेवावे.
५. आता डोसे करण्यासाठी, तवा तापवत ठेवावा. तेल ओतून ते गरम झाले कि एका पाळीमध्ये मिश्रण घेऊन बरोबर तव्याच्या मध्यभागी घालावे. आणि त्याच पळीने गोल फिरवावे.
६. वरून थोडेसे बटर लावून घ्या. आणि त्यावर चोको पावडर ची पेस्ट सगळीकडे पसरा.
७. डोसा उलटण्याची गरज नाही. झाला कि गरम गरम सर्व करा.


Chocolate Dosa - चोकलेट डोसा Chocolate Dosa - चोकलेट डोसा Reviewed by Prajakta Patil on August 17, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.