Tandulache Ghavan - तांदुळाचे घावन


लागणारा वेळ :१५ मिनीट
जणांसाठी:
साहित्य:
 • १ कप तांदुळाचे पीठ
 • १/४ कप दही
 • ४ चमचे बारीक कापलेला कांदा
 • ४ चमचे बारीक कापलेला टोमाटो
 • ४ चमचे बारीक कापलेली कोथिंबीर
 • मीठ चवीनुसार
कृती:
 1. एका भांड्यात तांदुळाचे पीठ, दही आणि मीठ घालून चांगले एकत्र करून घ्या.
 2. थोडे पाणी घालून पातळसे मिश्रण तयार करा.
 3. बारीक कापलेला कांदा आणि टोमाटो घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
 4. तवा गरम करा. १ चमचा तेल तव्यावर पसरवून घ्या.
 5. आता वरील मिश्रण तव्यावर ओता. नीट पसरवा.
 6. आणि तव्यावर २ मिनटे झाकण ठेवून शिजवून घ्या.
 7. घावन उलटून दुसऱ्या बाजूने शिजवून घ्या.
 8. sauce, चटणी किंवा सांबार बरोबर गरम-गरम खायला द्या.
टिप्स:
 • डोसे मऊ होण्यासाठी मिश्रण थोडे जाडसर ठेवा.
 • बारीक उभ्या चिरलेल्या भाज्या घातल्या तर हे घावन अधिक पौष्टिक होतील.

No comments:

@templatesyard