Mango Barfi - आंब्याची बर्फीलागणारा वेळ : २५ मिनिटे 

साहित्य :
  • आंब्याचा गर २ कप
  • साखर ३/४ कप
  • मावा १ कप
  • काजू, पिस्ता, वेलची
कृती :
१.२ मोठ्या आकाराच्या आंब्याचा गर काढून मिक्सर मधून फिरवून घ्या. साधारण २ कप गर तयार झाला पाहिजे.  २. काजू, पिस्ताचे उभे काप करून घ्या. वेलची सोलून पावडर करा.
३. एका pan मध्ये मावा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.
४. साखर आणि आंब्याचा गर pan मध्ये घेऊन २-३ मिनटे शिजवा. मध्ये मध्ये हलवत राहा.
५. हा गर घट्टसर होत आला की त्यात वरील माव्याचे मिश्रण घाला. आणि थोडा वेळ शिजवून घ्या. मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहा.
६. वरील मिश्रण घट्ट होत आले, की त्यात काजू-पिस्ता आणि वेलची पावडर घालून हलवा.
७. एका ताटाला थोडेसे तूप लावून त्यावर हे मिश्रण ओता. आणि वरून परत थोडे काजू-पिस्ता घालून सजवा.

८. बर्फी थंड होऊ द्या.

९. हव्या तश्या आकारात बर्फीचे काप करा.
Mango Barfi - आंब्याची बर्फी Mango Barfi - आंब्याची बर्फी Reviewed by Prajakta Patil on May 08, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.