Chicken Lollipop - चिकन लोलीपोप


लागणारा वेळ : २०-२५ मिनटे
जनांसाठी : ४

साहित्य :
८ चिकन lolipop sticks (ह्या sticks चिकनच्या दुकानात मिळतात.)
२ अंडी
६ वाटलेल्या हिरव्या मिरच्या
१/४ चमचे ajinomoto
१/४ चमचे pepper पावडर
१/४ चमचे गरम मसाला
१/२ चमचे Chili sauce
१/२ चमचे Soya sauce
५० gm मैदा
१ चमचा आले-लसून paste
खायचा लाल रंग (चिमुटभर)
१/२ कप पाणी
१/२ चमचा मीठ
तेल तळण्यासाठी

कृती :
१. चिकन lolipop sticks १/२ कप पाण्यात शिजवून घ्या. त्यात १/२ चमचा मीठ घाला.
२. lolipop sticks शिवाय सर्व साहित्य एकत्र करून एकजीव करून घ्या. त्याचे जाडसर असे मिश्रण तयार करा.
३. pan मध्ये तेल गरम करत ठेवा.
४. चिकन lolipop sticks वरील मिश्रणात बुडवून तेलात light brown कलर येईपर्यंत fry करून घ्या.
५. गरम-गरम szechwan sauce बरोबर सर्व करा.

टीप : चिकन lolipop sticks आपण घरी पण तयार करू शकतो. त्यासाठी chicken wing लागतात. एका chicken wing पासून २ lolipop sticks तयार करता येतात.
Chicken Lollipop - चिकन लोलीपोप Chicken Lollipop - चिकन लोलीपोप Reviewed by Prajakta Patil on May 01, 2012 Rating: 5

3 comments:

Jayanthy Kumaran said...

looks scrumptiously tasty

Swapnil Laichattiwar said...

i like ur recipes

Nitin said...

Nice recipe. I love cooking. Thanks

Powered by Blogger.