Vegetable Fried Rice - वेजीटेबल फ्राईड राईस


लागणारा वेळ : २० मिनटे
जणांसाठी : ४
साहित्य :
 • ४ कप तांदूळ
 • ४ चमचे लसूण paste
 • २ कप बारीक कापलेला ऊळपातीचा कांदा
 • १/२ कप बारीक कापलेली फरसबी
 • १/२ कप गाजराचे तुकडे
 • १/२ कप मटारचे दाणे
 • ४ चमचे बारीक कापलेली celery
 • २ चमचे vinegar
 • २ चमचे chilli sauce
 • ४ चमचे soy sauce
 • मीठ चवीनुसार
कृती :
१. तांदूळ नीट धुउन घ्यावेत.
२. एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. आणि त्यात वरील धुतलेले तांदूळ आणि थोडे मीठ टाका.
३. झाकण न ठेवता तांदूळ शिजवून घ्या.
४. तांदळाचा एकेक दाणा मोकळा झाला पाहिजे असा शिजवून घ्या.
५. भात शिजवून झाला की एका पातेल्यात काढून घ्या. आणि त्याला १ चमचा तेल चोळून घ्या.
६. आता थोडे तेल एका pan मध्ये गरम करायला ठेवा. त्यात लसूण आणि ऊळपातीचा कांदा घालून चांगले परतून घ्या. कांदा गुलाबी रंगाचा झाला पाहिजे.
७. आता सर्व भाज्या घालून ३-४ मिनटे परतून घ्या. भाज्या जास्त शिजू देऊ नका.
८. आता soy sauce, vinegar, chilli sauce आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्या. आणि सर्वात शेवटी तयार भात घालून चांगले परतून घ्या.
९. झाकण ठेवून २ मिनटे शिजू द्या.
१०. गरम गरम serve करा.

टीप : ह्यात तुम्ही आवडीप्रमाणे mushroom चे तुकडे शिजवून घालू शकता.
Vegetable Fried Rice - वेजीटेबल फ्राईड राईस Vegetable Fried Rice - वेजीटेबल फ्राईड राईस Reviewed by Prajakta Patil on April 25, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.